

Pandharpur’s iconic Lord Vitthal Temple witnesses record growth in income with massive devotee turnout.
Sakal
-भारत नागणे
पंढरपूर: महाराष्ट्रातील गोरगरिबांचे आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे लाडके दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची दिवसेंदिवस श्रीमंती वाढू लागली आहे. भक्तांनी गेल्या पाच वर्षात विठुरायाच्या चरणावर तब्बल दोनशे कोटीहून अधिक रुपयांचे दान अर्पण करून देवाचा खजिना अधिक समृध्द केला आहे. श्री विठ्ठल मंदिर समितीने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याने राज्यासह देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील लक्षणीय वाढली आहे.