
पंढरपूर : गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एका कामगार नेत्याला तब्बल १० लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. किरण पुरुषोत्तम घोडके(वय-२७, रा. अनवली) असे या कामगार नेत्याचे नाव आहे. ही कारवाई पुणे रोडवरील शहरातील हॉटेल राधेश येथे घडली. याप्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्र उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.