

Pandharpur Vitthal Temple News Temple Committee Approves Two Crore Rupees for Drought Relief and Support for Farmers in Maharashtra
sakal
पंढरपूर : गरीबांचा देव आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीने दुष्काळाच्या भीषण संकटात आपल्या लाडक्या भक्तांच्या मदतीला धाव घेतली आहे. मंदिर समितीने दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज दिली.