Pandharpur Well Collapse: कठडा अन्‌ विहिरीत गाडले गेले चार मजूर! आंबे येथील हृदयद्रावक घटना; तीन गावांत शोककळा, १३ तासांनंतर सापडला एकाचा मृतदेह

Four Labourers Trapped in Well Collapse at Ambe Village: ५० फूट खोल विहिरीचा कठडा कोसळला; चार मजूर ढिगाऱ्याखाली, एनडीआरएफचे बचावकार्य
Ambe Village Well Collapse Tragedy Four Labourers Trapped Under Soil and Rocks NDRF Team Leads Rescue Operation

Ambe Village Well Collapse Tragedy Four Labourers Trapped Under Soil and Rocks NDRF Team Leads Rescue Operation

sakal

Updated on: 

पंढरपूर : विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर मोजमाप घेण्यासाठी आत उतरलेल्या चार मजुरांवर काळाने घाला घातला. आंबे (ता. पंढरपूर) येथील ५० फूट खोल विहिरीचा कठडा अचानक कोसळल्याने माती आणि मोठमोठे दगड विहिरीत कोसळले. क्षणार्धात सुमारे २० ते २५ फूट विहीर बुजली आणि आत काम करणारे चार मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेने आंबेसह अनवली आणि रांझणीवर शोककळा पसरली. बचावासाठी ग्रामस्थ, प्रशासन आणि एनडीआरएफचे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. तब्बल १३ तासांनंतर रात्री साडेदहाच्या सुमारास सिद्धेश्‍वर घाडगे यांचा मृतदेह सापडला. अन्य तिघांचा शोध सुरूच होता.

Loading content, please wait...