

Women devotees waiting in long queues for Vitthal darshan at Pandharpur on the occasion of Makar Sankranti.
Sakal
पंढरपूर: सुवासिनी महिलांचा सौभाग्याचा समजला जाणारा मकर संक्रांत सण आज पंढरपुरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. रुक्मिणी मातेला वाणवसा देण्यासाठी राज्यभरातून महिला भाविकांनी विठ्ठल मंदिरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, आज मंदिर समितीने महिला भाविकांसाठी विशेष दर्शनाची व्यवस्था केली होती. मकर संक्रांतीच्या निमित्ताने जवळपास ६० ते ७० हजारांहून अधिक महिला भाविकांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या दर्शनाचा लाभ घेतला.