
पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तीची झीज झाली आहे. ही झीज भरून काढण्यासाठी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया (इपॉक्सी लेप) करावी लागणार आहे. या बाबतचे पत्र भारतीय पुरातत्त्व विभागाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला दिले आहे. पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार मूर्तीवर इपॉक्सी लेप लावला जाणार आहे. यामुळे मूर्तीची होणारी झीज थांबविता येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.