पंढरपूरच्या व्हॉटसऍप बाजारातून तब्बल 15 लाखांची उलाढाल 

Pandharpurs WhatsApp market has a turnover of around Rs 15 lakh
Pandharpurs WhatsApp market has a turnover of around Rs 15 lakh

पंढरपूर (जि. सोलापूर) : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाजार समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 3 मेपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची खरेदी विक्री व्हावी यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यातील पहिला व्हॉटसऍप बाजार सुरु केला आहे. या व्हॉटसऍप बाजाराला शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. चार दिवसांमध्ये जवळपास 700 ते 800 क्विंटल विविध भाजीपाल्याची खरेदी विक्री झाली आहे. यातून जवळपास 15 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. बाजार समितीच्या या उपक्रमामुळे लॉकडाऊनच्या काळात देखील शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची घर बसल्या खरेदी विक्री सुरु आहे. तर हमाल आणि तोलाईच्या खर्चात ही शेतकऱ्यांची मोठी बचत झाली आहे. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बेदाणा, डाळिंब आणि भाजीपाला खरेदी विक्रीसाठी पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. भाजापाला खरेदीसाठी सांगली, सातारा जिल्ह्यास कर्नाटकातील अनेक व्यापारी येथे येतात. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे येथील बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. 
दरम्यान, बंद काळात शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बाजार समितीने व्हॉटसऍपच्या माध्यमातून भाजीपाला खरेदी विक्री सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बाजार समिती या नवाने तीन व्हॉटसऍप ग्रुप तयार केले आहेत. यामध्ये सुमारे 750 शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. 
बाजार समितीने तयार केलेल्या या व्हॉटसऍप ग्रुपच्या माध्यमातून दररोज 200 ते 250 क्विंटल भाजीपाल्याची खरेदी विक्री होत आहे. यातून जवळपास दोन लाख रुपयांची उलाढाल होत आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक, येथील उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, सहाय्यक उपनिबंधक एम. एस. तांदळे, उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र कांबळे यांनी पुढाकार घेवून व्हॉटसअप बाजाराची संकल्पाना सुरु केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com