
पंढरपूर : कासेगाव (ता. पंढरपूर) येथे विवाहितेने मुलगा आणि मुलगी यांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पतीनेही आत्महत्या केली. घरगुती वादातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.