

Burglary in Pangav:
Sakal
बार्शी : पानगाव (ता. बार्शी) येथे कुटुंबीय घराला कुलूप लावून शेतामध्ये गेले असताना, भर दिवसा घरफोडी करून चोरट्यांनी कपाटातील चार तोळे सोने- चांदीचे दागिने असा चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.