मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक ! 'असे' असेल संमतीपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

20201112_174523.jpg


पालकांना अशी द्यावी लागेल संमती 
मुलगा कोणत्या शाळेत कितवीत शिकत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र, आता 23 नोव्हेंबरपासून शाळा तथा महाविद्यालये सुरु करण्यात आल्या आहे. प्रत्यक्षात अध्यापन सुरु होणार आहे. तरी यासाठी माझ्या पाल्यास मी शाळेत तथा महाविद्यालयात पाठविण्यास तयार आहे. त्यासाठी माझी संमती आहे. 

मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक ! 'असे' असेल संमतीपत्र

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारने नियमावली तयार करीत राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र, जो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे, त्याठिकाणच्या मुलांना शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. दुसरीकडे मुलांना शाळेत पाठवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पालकांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या संमतीपत्राशिवाय मुलांना शाळेत प्रवेश दिलाच जाणार नाही, असे महापालिकेचे उपायुक्‍त (शिक्षण) धनराज पांडे यांनी स्पष्ट केले. 


पालकांना अशी द्यावी लागेल संमती 
मुलगा कोणत्या शाळेत कितवीत शिकत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र, आता 23 नोव्हेंबरपासून शाळा तथा महाविद्यालये सुरु करण्यात आल्या आहे. प्रत्यक्षात अध्यापन सुरु होणार आहे. तरी यासाठी माझ्या पाल्यास मी शाळेत तथा महाविद्यालयात पाठविण्यास तयार आहे. त्यासाठी माझी संमती आहे. 


कोरोनाचा संसर्ग आता कमी झाल्याचे समाधान आहे, परंतु दुसऱ्या लाटेची चिंता कायम आहे. तरीही राज्य सरकारच्या निर्णयानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील सुमारे 35 हजार शाळांमधील 58 लाख 39 हजार विद्यार्थी नववी ते बारावीत प्रवेशित आहेत. सोलापूर शहरातील सहा शाळा असून त्यात सुमारे अडीचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी पालकांना आपल्या मुलाला शाळेत पाठविण्यास हरकत नसल्याचे संमतीपत्र द्यावे लागणार आहे. दुसरीकडे ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर त्याठिकाणच्या मुलांना शाळेत जाता येणार नाही, असा फतवा महापालिकेच्या वतीने काढण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पालकांच्या संमतीपत्राचा नमुना तयार करण्यात आला असून तो 23 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक पालकांना पोहचविला जाणार आहे. 


प्रतिबंधित क्षेत्रातील मुलांनाही प्रवेश नाही 
राज्य सरकारच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करुन शहरातील शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. पालकांचे संमतीपत्र असल्याशिवाय मुलांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. दुसरीकडे प्रतिबंधित क्षेत्रातील शाळा बंदच राहतील, तर शाळेच्या परिसरात रुग्ण सापडला असल्यास त्याठिकाणच्या मुलांना पुढील 14 दिवस शाळेत येता येणार नाही. 
- धनराज पांडे, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका, प्रशासन 

loading image
go to top