esakal | पालक-शिक्षकांच्या प्रयत्नाने ६१ शाळांचे बदलले रूपडे
sakal

बोलून बातमी शोधा

school

पालक-शिक्षकांच्या प्रयत्नाने ६१ शाळांचे बदलले रूपडे

sakal_logo
By
हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले पावणेदोन वर्षे बंद असलेल्या जि. प. शाळेच्या स्वच्छता व सौंदर्याकडे दुर्लक्ष झाल्याने शिक्षकांनी स्वखर्चाने पुढाकार घेतला. आता यात पालक व ग्रामस्थांनी सहभाग नोंदविल्यामुळे तालुक्यातील 61 शाळानी आपले रूप बदलले असून उर्वरित शाळा प्रगतीपथावर आहेत त्यामुळे दिवाळीनंतर शाळेचे वेगळेच सौंदर्य विद्यार्थ्यांसह पालकांच्या दृष्टीला पडणार आहे.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सभापती प्रेरणा मासाळ उपसभापती सुरेश ढोणे माजी सभापती प्रदीप खांडेकर गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्या भोसे, नंदेश्वर, मरवडे, बोराळे, ब्रम्हपुरी, घरनिकी, निंबोणी, सलगर बुद्रूक, पाठखळ, आंधळगाव, लक्ष्मी दहीवडी, हुलजंती, या 12 केंद्रातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकाबरोबर शालेय व्यवस्थापन समिती सदस्याच्या प्रयत्नाला आता पालकांनीही मदतीची जोड दिल्याने यात गती मिळाली.

हेही वाचा: सातारा : यंदाही पालिकेतर्फे फिरते मुर्ती संकलन केंद्र

तालुक्यामध्ये परिस्थितीचा जरी दुष्काळ असला तरी शिक्षणामध्ये मात्र सुकाळ आहे आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेमधून अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे परंतु यामुळे या कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे त्यांच्या शाळेची स्वच्छतेवर मोठा परिणाम जाणवला सध्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या मार्गावर असून शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने शासनाकडून विचार सुरू विचार विनिमय सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील 183 शाळेमधील शिक्षकांनी शाळा व तिच्या परिसरामध्ये स्वच्छता करून शाळेच्या परिसरामध्ये रंगरंगोटी करण्यात येत आहे आणि शाळेच्या भिंती बोलक्या केल्या आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे मन रमेल अशा पद्धतीने चित्रे सामान्य ज्ञान सुविचार निसर्ग रम्य निसर्ग व परिसराचे चित्र शैक्षणिक फायद्याच्या दृष्टीने रंगरंगोटी केल्यामुळे या शाळेने आपले रुपच बदलले आहे, लोकसहभागातून 32 लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करण्यात आली या वर्गणीतून शाळांचे चित्र बदलत असून सध्या 61 शाळांचे रंगरंगोटी पूर्ण करण्यात आले असून उर्वरित शाळांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा आसुरलेल्या आहेत.

- पोपट लवटे, गटशिक्षणाधिकारी

हेही वाचा: शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्यासाठी 35 कोटी मंजूर

कोरोनामुळे शाळा आणि विद्यार्थी यांच्यात कमी झालेला संवाद पुन्हा प्रस्थापित करताना शिक्षकांच्या आवाहनाला पालकांनी सहकार्य केल्याने स्वच्छता व रंगरंगोटीने विद्यार्थी शंभरी पूर्ण केलेल्या शाळेत रममान होतील.

- दामाजी माने, अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती.भाळवणी

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नवीन शाळा व दुरूस्ती,इतर भौतिक सुविधा साठी जि.प.च्या माध्यमातून आवश्यक त्या निधीची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

- दिलीप चव्हाण,सभापती आरोग्य व शिक्षण

loading image
go to top