पती परगावी, चोरट्यांचा ‘त्या’ घरात चाकू घेऊन प्रवेश! १३ वर्षीय मुलीने असे काही केले, चोरटे झाले पसार

चाकूचा धाक दाखवून दोघांनी गळ्यातील सोन्याची चेन, कर्णफुले, मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर घरातील पैसे काढून दे म्हणून गालावर चापट मारली, अशी फिर्याद रुपा श्रीनिवास गायकवाड (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ३) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली.
theft
theftsakal
Updated on

सोलापूर : चाकूचा धाक दाखवून दोघांनी गळ्यातील सोन्याची चेन, कर्णफुले, मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर घरातील पैसे काढून दे म्हणून गालावर चापट मारली, अशी फिर्याद रुपा श्रीनिवास गायकवाड (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ३, रुक्मिणी मंदिरामागे) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली. रविवारी (ता. १८) पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.

पती कामानिमित्त तीन दिवस परगावी, घरात पुरुष कोणीच नाही, १३ वर्षीय मुलगी व फिर्यादी रूपा व त्यांच्या बहिणीची दोन लहान मुले एवढेच घरात, रात्रीचे जेवण करून सर्वजण गाढ झोपेत होते. त्याचवेळी पहाटे तीनच्या सुमारास कोणीतरी घराचा दरवाजा वाजवला आणि रूपा झोपेतून उठल्या. त्यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी मंकी कॅप घालून दोघेजण दारात उभे होते.

दोघांच्याही हातात घरात वापरला जाणारा चाकू होता. त्यांनी वेळ न दवडता घरात प्रवेश केला. एकाने फिर्यादीस ढकलून देऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. गळ्यातील सोन्याची चेन व कर्णफुले काढून द्यायला सांगितले. त्याला विरोध केल्यावर एकाने चापट मारून रूपा यांच्या गळ्याला चाकू लावला. त्यावेळी जीव वाचविण्यासाठी त्यांनी दागिने काढून दिले. घरात पैसे कोठे ठेवले आहेत, ते काढून दे म्हणून त्यांनी दमदाटी सुरू केली होती.

तेवढ्यात बहिणीची मुलगी दीपिका जागी झाली. तिला एकाने घरातील पैसे आणून दे म्हणून गालावर चापट मारली. चोरट्यांनी ७८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक मुबारक शेख तपास करीत आहेत.

बेडरूममध्ये गेलेली दीपिका ओरडली, अन्‌...

घरातील कपाटातून पैसे घेऊन ये म्हणून एका चोरट्याने १३ वर्षीय दीपीकाला चापट मारली होती. घाबरलेली दीपिका बेडरूममध्ये गेली आणि तिने आरडाओरड सुरु केली. त्यावेळी परिसरातील लोक जागे होतील, आपण पकडले जाऊ म्हणून चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त प्राजंली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चंद्रकांत वाबळे यांनी घटनास्थळी भेट घेऊन रूपा गायकवाड यांना धीर दिला.पोलिसांनी सीसीटीव्हीची पडताळणी सुरु केली असून चोरट्यांच्या संभाषणातून ते त्याच परिसरातील असल्याचा पोलिसांना संशय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.