विद्यापीठाच्या ‘या’ स्पर्धेत सहभागी व्हा अन्‌ मिळवा 20,000 रूपयांचे बक्षीस! पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावर प्रासंगिक चित्रकला स्पर्धा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र, ललितकला व कला संकुलातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित भव्य प्रासंगिक चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व त्यांचे जीवनचरित्र’ हा स्पर्धेचा विषय आहे.
solapur
solapur univercityEsakal
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र, ललितकला व कला संकुलातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित भव्य प्रासंगिक चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व त्यांचे जीवनचरित्र’ हा चित्रकला स्पर्धेचा विषय आहे.

विद्यापीठातर्फे खुला गट (मुक्त हस्त चित्रकार), महाविद्यालयीन गट अशा गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सध्या उपलब्ध चित्रांशिवाय अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावर रचनात्मक चित्र काढणे अपेक्षित असून ते कमीत कमी २४ बाय ३० इंच व त्यापुढे आवश्यकतेनुसार मोठ्या आकाराचे असावे. महाविद्यालये तथा विद्यापीठात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी चित्रामागे स्वत:चे नाव, मोबाइल व व्हॉट्‌सॲप क्रमांक, पत्ता, ई-मेल आणि विद्यापीठ किंवा महाविद्यालयाच्या ओळखपत्राची झेरॉक्स लावावी. खुल्या गटातील स्पर्धकांनी त्यांचे नाव, मोबाइल क्रमांक, घरचा पत्ता, ई-मेल देणे आवश्यक आहे. २० जुलैपर्यंत स्पर्धकांनी कलाकृती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ललितकला व कला संकुलात जमा करायचे आहे.

असे आहे बक्षिसांचे स्वरूप

खुल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी २० हजार रूपये, द्वितीय क्रमांकासाठी ११ हजार रूपये व तृतीय क्रमांकासाठी सात व उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पाच हजार रूपये देऊन सन्मानित केले जाणार आहे. विद्यापीठ तथा महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकासाठी १० हजार, द्वितीय क्रमांकासाठी सात हजार, तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रूपये व उत्तेजनार्थ पुरस्कार म्हणून तीन हजार रूपये दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी ९६३७९६३९३९ व ९४२०४९०६७२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.