

Solapur Crime
सोलापूर : थिनर प्राशन केलेल्या रुग्णाला तपासण्यासाठी आलेल्या निवासी महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याचा प्रकार सिव्हिल रुग्णालयात घडला आहे. दुसऱ्या रुग्णाचा केस पेपर डॉक्टर पाहत होत्या. त्यावेळी जवळ थांबलेल्या रुग्णाने डॉक्टरच्या मांडीला स्पर्श केला. त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. पुष्पक तिपण्णा तळभंडारे (वय २८, रा. अशोक नगर, भगतसिंग मार्केट, सोलापूर) असे त्या संशयिताचे नाव आहे.