esakal | रुग्ण अन्‌ मृत्यूदर पुन्हा वाढला ! केंद्रीय पथक सोलापुरात पाच दिवस मुक्‍कामी; 'या' ठिकाणी करणार पाहणी

बोलून बातमी शोधा

22Breaking_News_8_0.jpg

द्विसदस्यीय पथकात विभागीय वरिष्ठ संचालक डॉ. ए. जी. अलोन आणि मेडिसिन विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. पियुष जैन यांचा समावेश 

रुग्ण अन्‌ मृत्यूदर पुन्हा वाढला ! केंद्रीय पथक सोलापुरात पाच दिवस मुक्‍कामी; 'या' ठिकाणी करणार पाहणी
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कमी झालेला कोरोना आता पुन्हा आपला विळखा घट्ट करू लागला असून त्यात मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये एकूण टेस्टच्या 5 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रूग्ण आढळत आहेत, त्याठिकाणचा अभ्यास करण्याठी सुमारे 50 केंद्रीय पथके राज्यात आली आहेत. रुग्णवाढीची कारणे, कोणत्या परिसरातच रुग्ण वाढत आहेत, मृत्यूचे प्रमाण का वाढत आहे, त्याचा वयोगट कोणता या सर्व बाबींचा अभ्यास व पाहणी करण्यासाठी द्विसदस्यीय केंद्रीय पथक सोलापुरात दाखल झाले आहे. पुढील पाच दिवस हे पथक सोलापुरातच तळ ठोकून असणार आहे.

ठळक बाबी... 

  • एकूण कोरोना संशयितांच्या टेस्टमध्ये 5 टक्‍क्‍यांपेक्षा अधिकजणांना होतेय कोरोनाची बाधा 
  • पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदरही वाढला; मृत्यूदर रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजनांची गरज 
  • मृत्यूदर व रुग्णवाढीचा अभ्यास करण्यासाठी व त्या परिसराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोलापुरात 
  • द्विसदस्यीय पथकात विभागीय वरिष्ठ संचालक डॉ. ए. जी. अलोन आणि मेडिसिन विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. पियुष जैन यांचा समावेश 
  • पाच दिवस पथकाचा मुक्‍काम सोलापुरातच; आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी बैठक 


सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी, माळशिरस, करमाळा, माढा या तालुक्‍यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तर पंढरपूर व बार्शीत मृत्यूदरही अधिक राहिला आहे. शहरातही कोरोनाच्या सुरवातीच्या काळाचा अनुभव पुन्हा येऊ लागला आहे. शहरात दररोज सरासरी आठ ते दहा रुग्णांचा मृत्यू होत असून ग्रामीणमध्ये चार ते सहा रुग्णांचा मृत्यू होत आहे. रुग्णदेखील दररोज सहाशेपेक्षा अधिक वाढत आहेत. शहरात झोपडपट्टी, अपार्टमेंट, बाजारपेठा अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. ग्रामीण भागात बार्शी, पंढरपूर, माळशिरस या तालुक्‍यातील रुग्णवाढीचा आलेख वाढत आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करत असतानाच लसीकरणाची स्थिती काय आहे, याचाही अभ्यास ही समिती करणार आहे. या समितीत केंद्रीय आरोग्य विभागाचे विभागीय वरिष्ठ संचालक डॉ. ए. जी. अलोन आणि मेडिसिन विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. पियुष जैन यांचा समावेश आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक होणार असून त्यात ते संपूर्ण माहिती जाणून घेतील. उद्यापासून ते शहर-जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पाहणी दौरा करणार आहेत.