जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट ! सध्या 16 हजार 855 रुग्णांवर उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख 21 हजार 732 रूग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे.

जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट ! सध्या 16 हजार 855 रुग्णांवर उपचार

सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second wave of Corona) जिल्ह्यातील विविध रूग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या 22 हजारांवर पोहचली होती. परंतु, आता शहर-जिल्ह्याला दिलासा मिळाला असून ऍक्‍टिव्ह रूग्णांची संख्या 16 हजार 755 झाली आहे. आज 12 हजार 933 संशयितांमध्ये एक हजार 585 बाधित आढळले असून ग्रामीणमधील 25 तर शहरातील चौघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. (The number of corona patients in Solapur district is declining)

हेही वाचा: "विद्यामंदिर'च्या अध्यक्षासह नऊ संचालकांवर गुन्हा दाखल करा!'

जिल्ह्यातील आतापर्यंत 13 लाख 42 हजार 172 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात एक लाख 42 हजार 189 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यातील तीन हजार 702 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख 21 हजार 732 रूग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. सध्या कोविड केअर सेंटर व रूग्णालयांमधील रूग्णांची संख्या 17 हजारांच्या आत आली आहे. दरम्यान, आज ग्रामीणमध्ये दहा हजार 113 संशयितांमध्ये एक हजार 541 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 24 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यानुसार अक्‍कलकोट तालुक्‍यात 24, करमाळ्यात 158, माढ्यात 258, उत्तर सोलापुरात 31, सांगोल्यात 92 आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 33 नवे रूग्ण आढळले आहेत. दुसरीकडे मंगळवेढ्यात 68 तर मोहोळ तालुक्‍यात 132 रूग्ण वाढले असून दोन्ही तालुक्‍यात प्रत्येकी पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. माळशिरस तालुक्‍यात 276 रूग्ण वाढले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच पंढरपूर तालुक्‍यात 263 रूग्ण वाढले असून नऊ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ग्रामीणमधील दोन हजार 619 रूग्ण बरे होऊन घरी परतले असून शहरातील 88 रूग्णही बरे झाले आहेत.

हेही वाचा: गळ्याला चाकू लावून तरुणाचे अपहरण ! बार्शीत सात जणांवर गुन्हा

शहरातील एकूण आठ प्रभागांमध्ये रुग्णच आढळले नाहीत

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता आटोक्‍यात येऊ लागला आहे. आज शहरातील दोन हजार 820 संशयितांची कोरोना चाचणी पार पडली. त्यात अवघे 44 बाधित आढळले आहेत. परंतु, मृत्यूदर अजूनही कमी झालेला नसून आज चौघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरातील चार, आठ, 12, 13, 14, 17, 19 आणि 20 या प्रभागांमध्ये एकही रूग्ण आढळला नाही. तर ग्रामीणमध्ये अक्‍कलकोट, करमाळा, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व सांगोला तालुक्‍यात एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही.

loading image
go to top