

Chandrakant Khaire makes shocking revelations at Sakal office — claims Pawar will soon leave Congress to join Thackeray camp.
Sakal
सोलापूर: ज्यावेळेस राजसाहेब फुटले होते त्या वेळेस शरद पवार साहेबांचा मला फोन आला होता. ‘मराठी माणसाची एकी फुटू देऊ नका. साहेबांना सांग. किंवा दोघांना भेटून सांग तू की मराठी माणसाचं नुकसान होईल. फुटू नका.’ असे ते म्हणाले होते. त्याची आठवण मी पवारसाहेबांना करून दिली आहे. त्यांचीच इच्छा पूर्ण होत असल्यामुळे मराठी माणसासाठी पवारसाहेब हे काँग्रेसला सोडून आमच्यासोबत येतील, असा दावा शिवसेना (उबाठा) ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. येथील सकाळ कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संवादात अनेक मुद्द्यांवर त्यांनी मते मांडली.