'प्रिसिजन'ने केली रेट्रोफिटेड इलेक्‍ट्रिक बसची निर्मिती!

'प्रिसिजन'ने केली रेट्रोफिटेड इलेक्‍ट्रिक बसची निर्मिती! भारतात पहिलाच प्रयोग
'प्रिसिजन'ने केली रेट्रोफिटेड इलेक्‍ट्रिक बसची निर्मिती! भारतात पहिलाच प्रयोग
'प्रिसिजन'ने केली रेट्रोफिटेड इलेक्‍ट्रिक बसची निर्मिती! भारतात पहिलाच प्रयोग
Summary

प्रिसिजन उद्योग समूहांतर्गत नेदरलॅड स्थित ई-मॉस कंपनीने भारतात प्रथमच रेट्रोफिटिंग ही संकल्पना प्रत्यक्षात आणत रेट्रोफिटेड इलेक्‍ट्रिक बसची निर्मिती केली आहे.

सोलापूर : ई-व्हेईकलच्या (E-vehicle) जगतात येथील प्रिसिजन उद्योग समूहांतर्गत (Precision Industry Group) नेदरलॅंड (Netherland) स्थित ई-मॉस कंपनीने भारतात (India) प्रथमच रेट्रोफिटिंग (Retrofitting) ही संकल्पना प्रत्यक्षात आणत रेट्रोफिटेड इलेक्‍ट्रिक बसची (Retrofitted electric bus) निर्मिती केली आहे. पेट्रोल (Petrol) व डिझेलवर (Diesel) चालणाऱ्या वाहनांमध्ये हे तंत्रज्ञान वापरून ही वाहने इलेक्‍ट्रिक बनवली जातात. जगभरात प्रदूषण कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नात प्रिसिजन उद्योग समूहाने मोठे पाऊल उचलले आहे. प्रिसिजन उद्योग समूहाचे अध्यक्ष यतिन शहा (Yatin Shaha) व कार्यकारी संचालक करण शहा (Karan Shaha) यांनी ही माहिती दिली.

'प्रिसिजन'ने केली रेट्रोफिटेड इलेक्‍ट्रिक बसची निर्मिती! भारतात पहिलाच प्रयोग
राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मोहिते-पाटलांची उपस्थिती !

प्रिसिजन उद्योग समूहाने भारतात पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्‍ट्रिक बस बनविली आहे. या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिझेलवर चालणाऱ्या 23 आसन क्षमतेच्या प्रवासी बसचे रूपांतर इलेक्‍ट्रिक बसमध्ये करण्यात आले आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. ही बस एका चार्जिंगमध्ये 180 किलोमीटर धावणार आहे. मागील वर्षभरापासून सुरू असलेला हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संस्थेने या बसच्या तांत्रिक तपासणीसाठी सहकार्य केले आहे. जगभरात प्रदूषण कमी करण्यासाठी ई-व्हेईकल्सचा पर्याय समोर येत आहे. नवीन ई-वाहने निर्मितीचा खर्च मोठा असतो. त्यामुळे जुन्या वाहनाचे रेट्रोफिटिंग ही संकल्पना समोर आली आहे. यामध्ये वाहनाचे पूर्वीचे इंजिन काढून त्याऐवजी इलेक्‍ट्रिक ड्राईव्हलाइन बसवले जाते.

'प्रिसिजन'ने केली रेट्रोफिटेड इलेक्‍ट्रिक बसची निर्मिती! भारतात पहिलाच प्रयोग
विमानतळ बंद, मीटर चालू! नेत्यांच्या सेवेवर दोन कोटी खर्च

प्रिसिजन उद्योग समूहाने 2018 मध्ये ई मॉस ही नेदरलॅंड स्थित कंपनी संपादित केली. त्यामुळे वाहनाचे इलेक्‍ट्रिफिकेशनचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. ई मॉसने आतापर्यंत 600 पेक्षा अधिक जड वाहनांचे इलेक्‍ट्रिफिकेशन केले आहे. भारतात रेट्रोफिटेड बस तयार करताना या बसचे 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पार्ट भारतात बनवले गेले आहेत. पुढील काळात सर्वच सुटे भाग भारतीय बनावटीची असावेत, असा प्रयत्न केला जाणार आहे. युरोपातील हे तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेसाठी उपलब्ध केले जाणार आहे. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हे तंत्रज्ञान प्राधान्याने वापरले जाणार आहे. याशिवाय प्रिसिजन उद्योग समूहाने शहरात पहिले ई-चार्जिग सेंटर देखील उभारले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com