esakal | सावधान! एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताय? 14 दिवस व्हावे लागेल क्‍वारंटाइन

बोलून बातमी शोधा

Home Quarantine
सावधान ! एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताय? 14 दिवस व्हावे लागेल क्‍वारंटाइन
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक संचारबंदी करूनही राज्यातील रुग्णसंख्या कमी झालेली नाही. दुसरीकडे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नवे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.

कडक लॉकडाउनच्या काळात एका शहरातून दुसऱ्या शहरात अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच खासगी वाहनांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्‍यक सेवा अथवा कामांशिवाय प्रवास करणाऱ्यांवरही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विनापरवाना प्रवास करणाऱ्यांना दहा हजारांचा दंड आकारला जाणार असून नियमांचे उल्लघन करणाऱ्या वाहनालाही तेवढाच दंड आकारला जाणार आहे. प्रवासी थांब्यावर उतरल्यानंतर बस ऑपरटेरने त्याच्या हातावर 14 दिवस होम क्‍वारंटाइनचा शिक्‍का मारणे बंधनकारक आहे. तर त्याच ठिकाणी त्या प्रवाशाची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार असून तशी व्यवस्था त्या ठिकाणी उभारावी, अशा सूचनाही संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशातून दिल्या आहेत. मंगल कार्यालयांनाही सक्‍त सूचना देण्यात आल्या असून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा: कोरोना रुग्णांसाठी धावला विठुराया ! उभारणार दोन भक्त निवासात 200 बेडचे कोव्हिड सेंटर

आदेशातील ठळक बाबी...

  • विवाहासाठी दोन तासांची परवानगी; 25 लोकांचीच उपस्थिती बंधनकारक

  • विवाहावेळी नियम मोडल्यास मंगल कार्यालयास 50 हजारांचा होईल दंड

  • नियमांचे उल्लंघन विवाह करणारे मंगल कार्यालय कोरोना जाईपर्यंत राहणार सील

  • पाच अथवा त्याहून कमी कर्मचारी असलेली सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील

  • खासगी वाहनात क्षमतेच्या 50 टक्‍केच प्रवाशांना परवानगी; नियम मोडल्यास दहा हजारांचा दंड

  • एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशाच्या हातावर 14 दिवसांचा होम क्‍वारंटाइनचा शिक्‍का

  • प्रवासी थांब्यावर उतरल्यानंतर त्याच ठिकाणी होणार त्याची कोरोनाची रॅपिड अँटिजेन टेस्ट