

PET Exam 2026 for PhD Admission 448 Seats and 1800 Applicants Eye Movement Monitoring Technology to Prevent Cheating
esakal
-तात्या लांडगे
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ‘पीएच.डी.’च्या ४४८ जागांसाठी २२ व २३ नोव्हेंबरला ऑनलाइन ‘पेट’ आयोजित केली आहे. अर्ज करण्यासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत शेवटची मुदत असून, आतापर्यंत १८०० उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली.