
-प्रभूलिंग वारशेट्टी
सोलापूर : सोमवारी सकाळपासून बलिदान चौकातील सोमाणी मंगल कार्यालयात विवाह सोहळ्याची लगबग सुरू होती. वधू पक्षाकडून वऱ्हाडी म्हणून मारवाडी समाजातील शेकडो स्त्री-पुरुष नटूनथटून आले होते. वर पक्षाकडून मराठा समाजातील पाहुणे मंडळी जमली होती. हा आंतरजातीय विवाह नव्हता, पण सामाजिक समरसता अनुभवायला येत होती. धर्मार्थ वडील जयनारायण भुतडा यांनी आपल्या लेकीचे मोठ्या थाटात लग्न लावून दिले. पोटच्या लेकीप्रमाणे घरी वाढवलेल्या अनाथ मुलीसाठी त्यांनी हा घाट घातला होता.