फिलॉसॉफी फॉर चिल्ड्रेन
फिलॉसॉफी फॉर चिल्ड्रेनCanva

"फिलॉसॉफी फॉर चिल्ड्रेन'! "चलो थिंक करे'चा शिक्षण क्षेत्रात अभिनव प्रयोग

"फिलॉसॉफी फॉर चिल्ड्रेन'! "चलो थिंक करे'चा शिक्षण क्षेत्रात अभिनव प्रयोग

"फिलॉसॉफी फॉर चिल्ड्रेन' (P4C) हा उपक्रम ऑनलाइन सुरू करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील हा एक अभिनव प्रयोग आहे.

बार्शी (सोलापूर) : कोरफळे (ता. बार्शी) येथील स्नेहग्राम प्रकल्पामध्ये (Snehagram Prakalp) "चलो थिंक करे' संस्थेमार्फत "फिलॉसॉफी फॉर चिल्ड्रेन' (P4C) (Philosophy for Children) हा उपक्रम ऑनलाइन सुरू करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील हा एक अभिनव प्रयोग आहे. एखादी गोष्ट, कृती, कविता, चित्र, व्हिडिओ किंवा जीवनप्रसंग सांगून, दाखवून व त्यावर विविध प्रश्न विचारून मुलांसोबत चर्चा करणे, मुलांची विचार करण्याची प्रक्रिया सुदृढ करणे असे "चलो थिंक करे'च्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. कार्यक्रम आठवड्यातून दोन दिवस, एक तास ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतो. या प्रयोगातून मुले स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करायचा हे शिकतात. स्नेहग्राम संस्थेच्या विद्यार्थ्यांबरोबर हा उपक्रम गेल्या सहा आठवड्यांपासून सुरू आहे. (Philosophy for Children is being implemented at Snehagram Prakalp in Barshi)

फिलॉसॉफी फॉर चिल्ड्रेन
सोलापुरी चादर पाहून भारावला सोनू सूद ! "जय हिंद'ने दिली भेट

आजच्या बदलत्या शिक्षण व्यवस्थेत विचार करणे, विचारांचे मूल्यमापन करणे, त्यावर योग्य निर्णय घेणे आणि घेतलेल्या निर्णयानुसार जबाबदारी घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे या गोष्टींचे महत्त्व खूप वाढले आहे. "चलो थिंक करे' "फिलॉसॉफी फॉर चिल्ड्रेन' (P4C) या पद्धतीमुळे मुले-मुली या नवीन बदलासाठी सहज तयार होतात. अभ्यासक्रमाची सत्रे पद्मनाभ केळकर, गौरवी संखे व सावनी लाड यांनी घेतली. अक्षय भास्करवार व संजय देशपांडे यांचे उपक्रमाला मार्गदर्शन लाभले. स्नेहग्रामचे संस्थापक श्री. महेश व विनया निंबाळकर यांनी या उपक्रमाचा मुलांना खूप उपयोग होत असल्याचे सांगितले.

फिलॉसॉफी फॉर चिल्ड्रेन
चहा विक्रेत्याचा प्रामाणिकपणा ! सापडलेला महागडा मोबाईल केला परत

स्नेहग्रामच्या मुलांसोबत दहा सत्र घेतल्यावर संस्थापक श्री. महेश व विनया निंबाळकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, या उपक्रमाचा मुलांना खूप उपयोग होतोय, मुलं एकमेकांना मदत करू लागली आहेत. एखाद्या गोष्टीबद्दल गैरसमज करून न घेता त्यावर विचारपूर्वक प्रतिसाद देऊन आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडू लागली आहेत. मुले पूर्ण आठवडाभर विचार प्रक्रियेत गुंतून राहतात. त्यावर चर्चा करतात. विषय जास्त जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासा वाढली आहे. त्यासाठी प्रश्न विचारून शोधही घेत आहेत, हा महत्त्वाचा बदल दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.

"चलो थिंक करे'ने हा उपक्रम स्नेहग्रामच्या विद्यार्थ्यांसोबत पुढे वर्षभर चालू ठेवण्याचे निश्‍चित केले आहे. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रज्ञा देशपांडे यांनी विज्ञान खेळणी भेट देऊन त्यांचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com