चहा विक्रेत्याचा प्रामाणिकपणा ! सापडलेला महागडा मोबाईल केला परत

चहा विक्रेत्याचा प्रामाणिकपणा ! रेल्वे स्टेशनवर सापडलेला महागडा मोबाईल केला परत
Mobile
MobileCanva
Updated on

प्रवासी केटी यांनी शेख यांना काही रक्कम बक्षीस स्वरूपात देऊ केली; मात्र शेख यांनी ती रक्कमदेखील नाकारून आजच्या जगात माणुसकी अजून टिकून असल्याचे दाखवून दिले आहे.

सोलापूर : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल फोन नजरचुकीने रेल्वे स्थानकावर विसरला गेला. तेथील चहा विक्रेत्याच्या प्रसंगावधानता व प्रामाणिकपणामुळे संबंधित प्रवाशास त्याचा मोबाईल फोन परत मिळाला. तौफीक शेख असे या चहा विक्रेत्याचे नाव असून, लोहमार्ग पोलिसांनी त्याचे कौतुक केले. याबद्दल प्रवासी केटी यांनी शेख यांना काही रक्कम बक्षीस स्वरूपात देऊ केली; मात्र शेख यांनी ती रक्कमदेखील नाकारून आजच्या जगात माणुसकी अजून टिकून असल्याचे दाखवून दिले आहे. (The tea seller honestly returned the mobile phone found in the railway station)

Mobile
15 जुलैनंतर शिथिल होणार निर्बंध ! मुंबई लोकलसंदर्भात सावध भूमिका

मध्य रेल्वेच्या (Central Railway) सोलापूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी (ता. 1) दुपारी तीनच्या सुमारास मुंबई- नागरकोईल या विशेष एक्‍स्प्रेसने प्रवास करीत असताना, सोलापूर स्थानकात चहा पिण्यासाठी मुरगप्पा कुमार केटी (वय 40, रा. तमिळनाडू, सध्या बेहरिन देश) हे उतरले होते. त्यांच्याकडील 27 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन स्थानकावर चहा विक्री करणाऱ्या कॅंटीनवर विसरला गेला. ही गोष्ट स्थानकावरील चहा विक्रेता तौफीक महंमद शेख (रा. सोलापूर) यांच्या निदर्शनास आली. त्यांनी हा विसरलेला मोबाईल फोन लोहमार्ग सोलापूर पोलिस ठाण्यात प्रामाणिकपणे आणून जमा केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रवासी मुरगप्पा केटी यांच्याशी संपर्क साधून त्यांना मोबाईल सापडल्याची कल्पना दिली.

Mobile
सोलापूर जिल्ह्यातील लस पुन्हा संपली !

प्रवासी केटी हे पुढील स्थानकावर उतरून सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात आले. त्यांची खात्री पटवून त्यांना तो मोबाईल परत करण्यात आला. विशेष म्हणजे, त्यांच्या मोबाईलमध्ये पुढील प्रवासाची फ्लाईटची तिकिटे, कंपनीची महत्त्वाची कागदपत्रे सेव्ह केलेली होती. चहा विक्रेते तौफीक शेख यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे लोहमार्ग पोलिसांनीही कौतुक केले. याबद्दल प्रवासी केटी यांनी शेख यांना काही रक्कम बक्षीस स्वरूपात देऊ केली; मात्र शेख यांनी ती रक्कमदेखील नाकारून आजच्या जगात माणुसकी अजून टिकून असल्याचे दाखवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com