esakal | नियम मोडणाऱ्यांना आता दंडुक्‍याने समजावणार ! पोलिस निरीक्षक निंबाळकरांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

PI Nimbalkar

नियम मोडणाऱ्यांना आता दंडुक्‍याने समजावणार ! पोलिस निरीक्षक निंबाळकरांचा इशारा

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोल्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियम मोडणाऱ्यांविरोधातील एकूण 3 हजार 156 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 12 लाख 95 हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर व्यापारी लोकांमधून नियम न पाळणाऱ्यांविरोधात 3 हजार 209 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 13 लाख 23 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. विनाकारण फिरणाऱ्यांच्या 58 मोटारी जप्त केल्या आहेत. तसेच दोन परमिट रूम व एक देशी दारूचे दुकानही सील करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.

सगळीकडेच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाच्या सर्व विभागांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सांगोला पोलिसांनीही कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांविरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, दिलेल्या नियमात दुकाने बंद न करणे, दुकानात मास्क न वापरणे, हॉटेल उघडणे अशा स्वरूपात गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सामान्य नागरिकांवर 3 हजार 156 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 12 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर व्यापारी वर्गामधून 3 हजार 209 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 13 लाख 20 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांच्या 58 मोटारी जप्त केल्या आहेत. तालुक्‍यातील दोन परमिट रूम व एक देशी दारूचे दुकानही सील करण्यात आले आहे. तसेच नियमापेक्षा जास्त लग्नकार्यात एकत्र आलेल्या दहा लोकांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे स्वतः रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात आपल्या दंडुक्‍याच्या भाषेने समजावत असतात. लसीकरणाच्या ठिकाणी लोकांनी जमावाने न येता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहनही पोलिस निरीक्षक निंबाळकर यांनी केले आहे.

हेही वाचा: तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? सीटी स्कॅनमधील स्कोअरवरून असे होते निदान

कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वांनीच या संकटाचे गांभीर्य ओळखून विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. कामानिमित्त बाहेर आलात तरी नियमांचे पालन केले पाहिजे. नियम मोडणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणे हे महत्त्वाचे नसून नागरिकांनी स्वतःची काळजी घेतली तर ती स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची, समाजाची काळजी घेतल्यासारखी आहे. गुन्हा दाखल करणे हा मुख्य उद्देश नाही.

- भगवान निंबाळकर, पोलिस निरीक्षक, सांगोला

loading image