esakal | तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? सीटी स्कॅनमधील स्कोअरवरून असे होते निदान

बोलून बातमी शोधा

CT Scan
तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? सीटी स्कॅनमधील स्कोअरवरून असे होते निदान
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : गेल्या वर्षी कोरोना विषाणूची लक्षणे आता दुसऱ्या लाटेमधून दिसून येणारी लक्षणे यावरून विषाणूने स्वतःमध्ये म्युटेशन घडवून आणलं आहे, हे स्पष्ट झालंय. त्यामुळे अनेक रुग्णांमध्ये म्युटंट व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर विविध प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. ही लक्षणं सर्वसामान्य वाटत असल्यामुळे आपल्याला कोरोना झाला नाही, असे समजून रुग्ण तपासणीला उशीर करत आहे. काही वेळा तर अँटिजेन आणि आरटी-पीसीआर या चाचण्यांमध्येही कोरोनाचे निदान होत नाही; मात्र प्रत्यक्षात कोरोनाचा संसर्ग झालेला असतो. म्हणून मग छातीचा सीटी स्कॅन केला जात आहे. कोरोना संसर्ग झाला आहे किंवा नाही आणि झाला असल्यास त्याची तीव्रता किती आहे, ते सीटी स्कॅनवरून शोधलं जात आहे.

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे हृदय व फुफ्फुस शल्य विशारद डॉ. विजय अंधारे म्हणतात, आरटी-पीसीआर टेस्टमधून अलीकडे कोरोना निगेटिव्ह येण्याचे प्रमाण 70 टक्के असल्याचे दिसून येत आहे. एकतर हा म्युटंट स्ट्रेन आहे. बऱ्याच वेळा तो आरटीपीसीआर टेस्टमध्ये डिटेक्‍ट होत नाही. परंतु, काहींचं म्हणणं असं आहे, की कुठलाही म्युटंट स्ट्रेन जरी असला तरी आरटी-पीसीआरमधून सुटू शकत नाही. मग तरी पण हा टेस्ट निगेटिव्ह का येतो? त्यानंतर अंदाज बांधला गेला, की कोरोना विषाणूचा लोकेशन चेंज होत आहे. पूर्वी तो नाकामध्ये किंवा घशामध्ये सापडायचा. मात्र हा विषाणू आता लगेचच खाली सरकतोय व फुफ्फुसामध्ये त्याचं जास्त प्रमाण दिसून येत आहे. त्यामुळे नाक व घशामधून तो मिळून येत नाही.

हेही वाचा: ना रेमडेसिव्हीर ना ऑक्‍सिजनची लागली गरज ! अठ्ठ्याण्णव वर्षीय आजोबांनी केली कोरोनावर मात

त्यावर मेडिकली चर्चा घडून प्रत्येक रुग्णावर एंडोस्कोपी करून फुफ्फुसापर्यंत जायचं व तेथून ते शोषून घेऊन त्याचा आरटी-पीसीआर करायचा. त्यानंतर हमखास त्याची टेस्ट पॉझिटिव्ह यायलाच पाहिजे. मात्र, अशी टेस्ट करणं खूप जिकिरीचं आहे. कारण, प्रत्येक रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये न्यावं लागून पुढील प्रोसिजर करणं रुग्णाला मानवणारं नाही. हेल्थ वर्करही इन्फेक्‍ट होत राहणार.

शेवटी आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह जरी आली तरी लक्षणं दिसत असल्यास सीटी स्कॅनवरून त्याचे निदान होऊ शकते. सीटी स्कॅन दोन प्रकारे केला जातो. कोरॅड्‌स सिस्टीमद्वारे सहा टप्पे पाडले जातात. कोरॅड्‌स वन म्हणजे नो कोरोना, कोरॅड्‌स टू म्हणजे लो लेव्हल इन्फेक्‍शन म्हणजे काही तरी आहे असे वाटणे. कोरॅड्‌स थ्री म्हणजे इंटरमिजिएट म्हणजे मधल्या लेव्हलचं ज्याचा अर्थ आहे, डेफिनेटली कशाचा तरी इन्फेक्‍शन आहे. कोरॅड्‌स फोर म्हणजे हाय लेव्हल इन्फेक्‍शन, ज्याचा अर्थ कोरोनासारखा संसर्ग आहे. कोरॅड्‌स फाईव्ह म्हणजे अत्यंत जास्त किंवा 99 टक्के हा कोरोनाच आहे, असे निदान केले जाते. कोरॅड्‌स सिक्‍स म्हणजे शंभर टक्के कोरोनाच आहे, अशी शंका व्यक्त केली जाते. जर सीटी स्कॅनमध्ये थ्री, फोर व फाईव्हच्या टप्प्याचे निदान झाल्यास पुढील उपचार करण्याचा सल्ला रुग्णाला दिला जातो.

हेही वाचा: शहरात एकूण टेस्टमध्ये 12.45 टक्‍के लोक पॉझिटिव्ह ! उपमहापौरांच्या प्रभागात उच्चांकी मृत्यू

फुफ्फुसावर कोरोनाचा किती प्रादुर्भाव झाला त्यावरून ठरतेय पुढील उपचाराची दिशा

उजवा फुफ्फुस व डावा फुफ्फुस असे फुफ्फुसाचे दोन भाग आहेत. उजव्या फुफ्फुसामध्ये तीन भाग (लोब) आहेत; वरचा, मधला व खालचा. तर डाव्या फुफ्फुसाचे दोन भाग असतात. दोन्ही फुफ्फुसांचे मिळून पाच भाग होतात. आणि पाच भागांमध्ये कोरोना संसर्ग किती झाला आहे, हे कळण्यासाठी सीटी स्कॅनमध्ये पाच मार्क्‍स दिले जातात. एका लोबला पाच मार्क असे एकूण 25 मार्क्‍स. मग सीटी स्कॅनचा अभ्यास करून कोरोनामुळे फुफ्फुस किती बाधित झाला, यावरून मार्क्‍स दिले जातात. फुफ्फुसाचा एखादा पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी बाधित झाला असेल तर त्याला एक मार्क दिला जातो. पाच ते 25 टक्‍के दोन मार्क, 25 ते 50 टक्के बाधित झाल्यास तीन मार्क, 50 ते 75 टक्के बाधित झाल्यास चार मार्क तर 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बाधित झाल्यास पाच मार्क दिले जातात. असा पाचही भागांचा अभ्यास करून स्कोअरिंग देतात. या स्कोअरनुसार रुग्णांची स्थिती ठरवून त्यांच्यावर उपचार केले जातात, अशी माहिती डॉ. विजय अंधारे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.