
सोलापूर : राज्यातील २० ते ४० वयोगटातील महिला व तरुणींना रोजगार मिळावा, आर्थिक व सामाजिक पुनर्वसन व सक्षमीकरण व्हावे आणि मुली व महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा अशा प्रमुख हेतूने तत्कालीन महायुती सरकारने ८ जुलै २०२४ रोजी पिंक ई-रिक्षा देण्याचा निर्णय घेतला. १७ शहरांमधील १० हजार महिला-तरुणींना पिंक ई-रिक्षा मिळणार आहेत, पण अद्याप बहुतेक लाभार्थी त्या रिक्षांच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जासाठी बॅंका अर्जदाराच्या ‘सिबिल’ स्कोअरवर बोट ठेवत आहेत.