बार्शी - एका अल्पवयीन मुलीचा विवाह जमलेला असताना तरुणाने माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडते, असे म्हणून विनयभंग केला. हातावर गोंधवलेले तिचे नाव दाखवत, तु विवाह माझे सोबत कर, असे म्हटले तर त्याचे आई-वडिल, भावाने तिला बंदुकीची धमकी देऊन त्याचेशी बोल, असे सांगत दमदाटी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे.