25 दिवसाच्या चिमुकल्याचा खून! आईला पोलिस कोठडी | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

25 दिवसाच्या चिमुकल्याचा खून! आईला पोलिस कोठडी
25 दिवसाच्या चिमुकल्याचा खून! आईला पोलिस कोठडी

25 दिवसाच्या चिमुकल्याचा खून! आईला पोलिस कोठडी

सोलापूर : येथील मुरारजी पेठेतील मंगळवेढा चाळीतील 25 दिवसांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या ड्रममध्ये टाकून खून (Crime) करण्यात आला आहे. या प्रकरणात त्या चिमुकल्याची आई प्रतीक्षा सुरवसे हिला फौजदार चावडी पोलिसांनी (Foujdar Chawdi Police Station) अटक केली आहे. न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली असून, चिमुकल्याचा खून का केला, या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.

हेही वाचा: आईवडिलांना वाटले की मुलगी इंजिनिअर किंवा डॉक्‍टर होईल, पण..!

पहिल्या मुलाचा वाढदिवस असतानाच त्या चिमुकल्याच्या बारशाचा कार्यक्रम लगेचच करण्याचे नियोजन केल्याने सुरवसे यांच्या घरी नातेवाईक आले होते. कार्यक्रमाच्या आदल्यादिवशी संकेत व प्रतीक्षा सुरवसे यांचा 25 दिवसांचा चिमुकला नाव ठेवण्यापूर्वीच मरण पावला. बाळाची आई प्रतीक्षा ही त्याच्यासोबत घरात झोपली होती. मॉलमध्ये कामाला असलेले संकेत सुरवसे हे घरात गेल्यावर बाळ जागेवर नसल्याचे त्यांना दिसले. बाळ कुठे आहे, अशी विचारणा त्यांनी केली. त्या वेळी सर्वजण त्या चिमुकल्याचा शोध घेऊ लागले. 25 दिवसांचे बाळ रांगणार नाही, चालणार नाही, तरीही ते कुठे गेले म्हणत त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला.

दरम्यान, घरासमोरील भिंतीजवळील पाण्याच्या ड्रममधून पाणी घेण्यासाठी संकेत सुरवसे हे त्या ठिकाणी गेले. त्या वेळी बाळ पाण्यावर तरंगताना त्यांना दिसले. त्या वेळी आरडाओरड करत त्यांना अश्रू अनावर झाले. 25 दिवसांपूर्वीच दुनियेत आलेला चिमुकला मरण पावला होता. शासकीय सर्वोपचार रुग्णालयात त्याला नेण्यात आले, परंतु पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 25 दिवसांचे बाळ पाण्यात पडून मरण पावल्याची घटना फौजदार चावडी पोलिसांना समजली. त्या वेळी सहाय्यक पोलिस आयुक्‍त माधव रेड्डी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी घटनास्थळी भेट दिली. तेथून सुरू झाला, बाळाच्या मारेकऱ्याचा शोध.

हेही वाचा: एसटी वाहतूक सुरू होणार! परिवहनमंत्री घेणार 'हा' निर्णय

खुनाचे कारण आज होणार स्पष्ट

25 दिवसांचे बाळ पाण्याच्या ड्रममध्ये पडलेच कसे, हा प्रश्‍न पोलिसांसमोर होता. त्या बाळाला ना रांगताही येत नाही, तरीही ते पाण्याच्या ड्रमपर्यंत पोचलेच कसे? त्या बाळाला आईची गरज असून तेवढ्या वयात आईशिवाय बाळ कोणाकडेही राहणार नाही, यादृष्टीने पोलिसांनी बाळाच्या आईचा जबाब नोंदविला. त्यांना संशय आल्याने मृत बाळाची आई प्रतीक्षा हिला अटक केली. आता तिच्याकडून कसून चौकशी केली जात असून, शनिवारी (ता. 20) खुनाचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिली.

loading image
go to top