esakal | अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून! तुळजापूर रोड येथील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

murder

अनैतिक संबंधाच्या संशयावरून भवानी पेठ, मड्डी वस्ती येथील नामदेव चौगुले याचा खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून! तुळजापूर रोड येथील घटना

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून भवानी पेठ, मड्डी वस्ती येथील नामदेव गजानन चौगुले (रा. मड्डी वस्ती, शांतीनगर, सोलापूर) याचा खून (Crime) झाल्याची घटना मंगळवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी (Jodbhavi Peth Police Station) संशयित शंकर गुंडाप्पा लिंबोळे (रा. मड्डी वस्ती, शांतीनगर, सोलापूर) व त्याच्या साथीदारास ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: मुलगी झाल्याने घडविला कोरोनाबाधित पत्नीचा मृत्यू!

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मृत नामदेव चौगुले याने शंकर लिंबोळे याच्या बहिणीस फूस लावून पळवून नेले होते. तोच राग मनात धरून शंकर लिंबोळे याने कुऱ्हाडीचे घाव घालून नामदेव चौगुले याला ठार मारले व स्वतःहून पोलिस ठाण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनी त्याला घटनास्थळापासून काही अंतरावरच ताब्यात घेतले. नामदेव चौगुले हा आपल्या घरी मंगळवारी (ता. 7) रात्री जेवत बसला होता. त्या वेळी त्याला शंकर लिंबोळे याने, तुझ्याशी काम आहे, तुम्ही बाहेर ये, असे सांगत बाहेर नेले. त्याला शिवीगाळ करत त्याच्या डोक्‍यावर कुऱ्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत नामदेव चौगुले गंभीर जखमी झाला होता. त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: 'एकटे जाऊ नका मलाही सोबत घेऊन चला!' पतीनंतर पत्नीचेही निधन

या घटनेबाबत लिंबोळे याला मंगळवारी रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, मृत चौगुले याची पत्नी आणि मुलगा यांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर तपास गतिमान करून पोलिसांनी लिंबोळेच्या साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिस उपायुक्‍त वैशाली कडूकर यांनी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम हे करीत आहेत.

loading image
go to top