महिलेवर खुनी हल्ला करणारा संशयित नऊ दिवसांनी पोलिसांच्या जाळ्यात!

महिलेवर खुनी हल्ला करणारा संशयित नऊ दिवसांनी पोलिसांच्या जाळ्यात!
arrest
arrestGallery
Updated on
Summary

एका 30 वर्षीय महिलेला चारचाकी गाडीतून निर्जन ठिकाणी नेले. तेथे उसने दिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून खून करण्याचा प्रयत्न केला.

मोहोळ (सोलापूर) : एका 30 वर्षीय महिलेला चारचाकी गाडीतून निर्जन ठिकाणी नेले. तेथे उसने दिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून धारदार शस्त्राने (Sharp weapon) गंभीर जखमी करून खून (Crime) करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी फरार असलेला आरोपी देवराज ऊर्फ कृष्णराज सुखदेव बेडगे (रा. मानेगाव, ता. माढा) यास मोहोळ पोलिसांनी (Mohol Police) अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

arrest
लपवला जातोय कारभार! कासेगाव ग्रामपंचायतविरोधात महिला सदस्याची तक्रार

निर्मला लक्ष्मण चौगुले (रा. खडकपूर, मोडनिंब, ता. माढा) ही महिला तालुक्‍यातील देवडी फाटा येथील एका हॉटेलमध्ये काम करते. या हॉटेलमध्ये चार महिन्यांपूर्वी कृष्णा ऊर्फ देवराज पाटील हा चहा पिण्यासाठी आल्यावर त्या महिलेची ओळख करून घेत ओळखीतून दोघांमध्ये मैत्री होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातूनच मला पैशांची गरज आहे, असे म्हणत देवराज कृष्णा याने संबंधित महिलेकडून एक लाख 30 हजार रुपये घेतले होते. ते उसने घेतलेले पैसे त्या महिलेने परत मागितले होते. ते पैसे तुला देतो म्हणून देवराज याने 6 सप्टेंबर रोजी त्या महिलेस कारमधून भांबेवाडी गावाच्या परिसरात निर्जन ठिकाणी नेऊन धारदार हत्याराने हल्ला करून रस्त्यावरच टाकून पळून गेला होता. या प्रकरणी त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार देवराज कृष्णा पाटील याच्या विरोधात 7 सप्टेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

arrest
भोयरे शिवारात गळ्याला कोयता लावून पालघरच्या प्रवाशांना लुटले!

या गुन्ह्यातील संशयित हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर खारगे यांनी हा आरोपी तालुक्‍यातील भोयरे येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून त्याला गुन्ह्यात वापरलेल्या कारसह ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 18 सप्टेबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Marathi News Esakal
www.esakal.com