
तुळजापुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. माझ्यावर प्रेम कर, लग्न कर नाहीतर तुझी सोशल मीडियावर बदनामी करेन अशी धमकी तरुणांकडून दिली जात होती. बदनामीच्या भीतीने शेवटी मुलीनं आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.