
सोलापूर: बॉम्बे पार्क येथील मंगल कार्यालयातील खोलीत ठेवलेल्या पिशवीतील दोन लाख २३ हजार रुपयांचे दागिने १७ डिसेंबर २०२४ रोजी चोरीला गेले होते. अनिता सुनील जत्ती (रा. बोळकोटा, बरूर, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या फियार्दीवरून संगीता वारे (रा. कल्याण नगर) हिच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.