पुळूजचा धनंजय होनमाने नक्षली हल्ल्यात हुतात्मा

Police Inspector Dhananjay Hanuman martyred in Naxal attack
Police Inspector Dhananjay Hanuman martyred in Naxal attack

पंढरपूर (सोलापूर) : भामरागड तालुक्यातील पोरयकोटी- कोरपर्शी जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पुळूज (ता. पंढरपूर) येथील क्युआरटी पथकातील पोलिस उपनिरीक्षक धनंजय होनमाने (वय26) हे आज हुतात्मा झाले. हुतात्मा धनंजय होनमाने यांचे गावातील एका मुलीशी विवाह ठरला होता. सुट्टीवर आल्यानंतर पुढच्या महिन्यात विवाह करण्याचे निश्चित करण्यात आले होते. सुखी संसाराची स्वप्ने पाहण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तानाजी होनमाने हे शेतकरी कुटुंब. त्यांना विकास आणि धनंजय होनमाने ही दोन मुले. धनंजय हा लहानपणापासूनच हुशार होता. पोलिस खात्यामध्ये भरती होवून देश सेवा करण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार ते तीन वर्षापूर्वी क्युआरटी पथकात पोलिस उपनिरीक्षक पदासाठी भरती झाले. धोरला भाऊ विकास हा उच्चशिक्षण घेत आहे. वडील तानाजी होनमाने आणि आई पुळज येथेच शेती करतात. अत्यंत हालाखीमध्ये धनंजयने आपले प्राथमिक शिक्षण पुळूज येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे घेतले. त्यानंतर ते पोलिस खात्यामध्ये भरती झाले. कर्तव्यावर असताना आज भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले. या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच पुळूज गावावर शोककळा पसरली.
धनंजय लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्यांच्या मृत्युने त्यांच्या आई वडीलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे अलीकडेच लग्न ठरले होते. गावातील मुलीशी विवाह देखील पुढच्या महिन्यात होणार होता. लग्नाआधीच धनंजयला वीर मरण आल्याचे गावकर्यांसाठी मोठा धक्का असल्याचे त्यांचे मित्र नागेश बाबर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com