

Legal Row in Solapur Police Station: Officer Accused of Threatening Advocate
sakal
सोलापूर : येथील ए. जी. मल्टिकार डिलरशीप ॲण्ड कॅब सर्व्हिस कंपनीचे विधी सल्लागार म्हणून ॲड. आशुतोष शिंदे विजापूर नाका पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी ‘माझी ओळख करून देऊन कृपया तक्रारीचे स्वरूप सांगावे,’ अशी विनंती त्यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक लालसिंग राठोड यांच्याकडे केली. मात्र, ‘तुला माहिती नसेल तर उठ, बाहेर जा,’ असे ते मोठ्या आवाजात बोलले.