पोलिस उपअधीक्षक कदम यांची धडाकेबाज कारवाई ! सोनकेत लाखो रुपयांची हातभट्टी दारू जप्त  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hatbhatti

पोलिस उपअधीक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी सोनके येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये 1 लाख 23 हजार 450 रुपये किमतीची 17 बॅरल (5300 लिटर) दारू जप्त केली आहे. 

पोलिस उपअधीक्षक कदम यांची धडाकेबाज कारवाई ! सोनकेत लाखो रुपयांची हातभट्टी दारू जप्त 

पंढरपूर (सोलापूर) : पोलिस उपअधीक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी सोनके येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये 1 लाख 23 हजार 450 रुपये किमतीची 17 बॅरल (5300 लिटर) दारू जप्त केली आहे. 

पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अलीकडच्या काही दिवसांमध्ये दारू, मटका, जुगार, भुरट्या चोऱ्या, वाळू चोरी यांसारख्या अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली आहे. वारंवार तक्रार करूनही अशा धंद्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता थेट नव्याने पोलिस उपअधीक्षक म्हणून रुजू झालेले विक्रम कदम यांनी अशा अवैध धंद्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. 
उपअधीक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी सोनके येथे हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. 

सोनके भागात हातभट्टी दारू तयार करून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (ता. 11) रात्री सोनके तलावाजवळ दिलीप गायकवाड यांच्या उसाच्या शेतात विजेच्या खांबावरून चोरून वीज घेऊन हातभट्टी तयार करण्यात येत होती. या ठिकाणी गूळ मिश्रित व इतर घातक रसायने मिसळून हातभट्टी दारू तयार करण्याचे काम सुरू होते. 

पोलिसांची धाड पडल्याचे लक्षात येताच संशयित आरोपी दिलीप कृष्णा गायकवाड आणि मोहन अनिल दिघे (रा. सोनके, ता. पंढरपूर) हे पळून गेले. कारवाई दरम्यान पोलिसांनी हातभट्टी उद्‌ध्वस्त करून सर्व साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी संशयित आरोपी गायकवाड आणि दिघे यांच्या विरोधात पोलिसांनी पहिल्यांदाच भादंवि 328 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, उपनिरीक्षक मैनुद्दीन खान, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कांबळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल आनंता शिंदे, पोलिस नाईक मोहसीन सय्यद, रसीद मुलाणी, अंकुश नलवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top