
सोलापूर : छेडछाडीचा वाद रात्री मिटल्यानंतर सोमवारी (ता. २) सकाळी सव्वादहाच्या सुमारास कांबळे व गायकवाड या दोन गटात हाणामारी सुरू झाली. कोंतम चौकात झालेल्या या भांडणामुळे परिसरात काहीवेळ तणाव होता. यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्यांना जिवंत सोडणार नाही, कोयत्याने तुकडे करू’ अशी धमकी देऊन दहशत निर्माण करण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. कौंतम चौक परिसरातील धाकटा राजवाडा येथे राहणाऱ्या दोन गटाने परस्परविरोधात जोडभावी पेठ पोलिसांत फिर्यादी दिल्या असून एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.