

“Solapur BJP reshuffle creates new power balance — Manish Deshmukh out, Rajan Patil supporter in.”
Sakal
सोलापूर: भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सोलापूर पूर्वची जिल्हा कार्यकारिणी सोमवारी (ता. ३) जाहीर केली. काहीजणांच्या पक्षप्रवेशावरून संघर्ष सुरू असताना या कार्यकारिणीत समतोल साधला असला तरी आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख यांना यातून वगळले असून युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद सचिन कल्याणशेट्टी तर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद शहाजी पवार गटाला देण्यात आले आहे. तर नुकतेच पक्षात आलेले राजन पाटील गटालाही संधी मिळाली आहे.