

MLA Raju Khare
sakal
पंढरपूर: राज्यात २९ महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले मोहोळचे आमदार राजू खरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र आले तर फडणवीस यांचे सरकार पडेल असे राजकीय विधान खरे यांनी केले आहे.