

Early Survey and Strategy Talks Begin in Mohol Ahead of Key Rural Elections
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक संपताच विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींना आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेक इच्छुकांनी आपल्या प्रचाराच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्या असून, जिल्हा परिषद मतदार संघातील विविध गावातील नातेवाईकाकडे हेलपाटे वाढले आहेत. दरम्यान जिल्हा परिषद मतदार संघात आपल्या समाजाचे किती मतदार आहेत याची चाचपणी सुरू झाली आहे.