
Political groups led by Rajendra Raut and Dilip Sopale gear up for Barshi mayor election as women’s reservation sparks contest.
Sakal
-प्रशांत काळे
बार्शी: ‘अ’ वर्ग असलेल्या व सर्वांत मोठ्या ४२ नगरसेवक असणाऱ्या बार्शी नगरपरिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत असून, मागील चार वर्षांपासून राजकीय पक्ष कधी निवडणूक होतेय, याची वाट पाहून जय्यत तयारी करीत होते. मागील निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांची सत्ता नगरपरिषदेवर होती तर आता विद्यमान आमदार दिलीप सोपल सत्ता काबीज करणार का? याची जोरदार चर्चा शहरासह तालुक्यात सुरू झाली आहे.