
-प्रमोद बोडके
सोलापूर : खासदारकी झाली, आमदारकी झाली. गावातील राजकारण हलवून सोडणाऱ्या झेडपी अन् ग्रामपंचायतीच्या निवडणुका मात्र रखडल्या होत्या. गावगाड्यातील राजकारणाचा धुरळा उडवून देणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटना या आठवड्यात घडणार आहेत. सोमवारी (ता. १४) जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणाची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार आहे. मंगळवारी (ता. १५) जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचाची आरक्षण सोडत होणार आहे.