

Local residents raising concerns during a discussion over the controversial corridor project in Pandharpur.
Sakal
पंढरपूर: येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित काॅरिडाॅरचा मुद्दा पुन्हा चर्चेचा सुरु विषय झाला आहे. राज्य सरकारने काॅरिडाॅर करण्याच्या हालचाली सुरु केल्यानंतर बाधित दुकानदार आणि रहिवाशांनी त्याला विरोध केला आहे. याच मुद्द्यावरुन आता राजकीय धुळवड सुरु झाली आहे. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सोमवारी (ता.2) बाधितांनी काढलेल्या मोर्चात सहभागी होत काॅरिडाॅर चंद्रभागानदीच्या पलीकडे ( शेगाव दुमाला परिसर ) तयार करावा अशी मागणी केली आहे. तर आमदार समाधन आवताडे यांनी आमदार पाटील यांनी एकदा वारी काळात विठ्ठल मंदिर परिसरात चालत प्रदक्षिणा पूर्ण करावी असा सल्ला दिला आहे. दोन आमदारांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे काॅरिडाॅरच्या मुद्द्याचे राजकारण होत असल्याने बाधितांमधून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.