सहकारात सोसायटीवर मात्र बबनराव आवताडे हे एकमेव पकड असणारे नेते ठरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बबनराव आवताडे

सहकारात सोसायटीवर मात्र बबनराव आवताडे हे एकमेव पकड असणारे नेते ठरले

मंगळवेढा : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या अर्थकारणाची नाळ असलेल्या विकास सोसायटीच्या राजकारणात तालुक्यातील सहकारातील ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांचे एकहाती वर्चस्व कायम राहिले.तालुक्यातील नेत्याच्या राजकीय पक्ष व सत्तांतराच्या अनेक घटना घडल्या तरी सहकारात सोसायटीवर मात्र बबनराव आवताडे हे एकमेव पकड असणारे नेते ठरले आहेत.

तालुक्यामध्ये जवळपास 80 विकास सोसायटी असून त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संलग्नित असून ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना बागायती व जिरायत पिकावर कर्जरूपाने मदत करण्यासाठी आघाडीवर ठरलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये सध्या राष्ट्रीयकृत बॅकाकडून सर्वसामान्य शेतकऱ्याना थेट बँकेत येथूनही पिक कर्ज मिळण्यास अनेक आडकाठी येत आहेत. बँका अधिकाऱ्याची संलग्नित असलेल्यांनाच तात्काळ पीक कर्ज उपलब्ध होते मात्र ज्याचा राजकारणाशी संबंध नसलेल्या शेतकऱ्यांना मात्र पीक कर्जासाठी तिष्ठत राहावे लागत आहे. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना राष्ट्रीयकृत बँकांनी जवळच्या नाच पिक कर्ज देऊन उद्दिष्टपूर्ती केली आहे त्यामुळे तालुक्यातील 50 टक्के पेक्षा अधिक शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत बहुतांश शेतकऱ्यांनी विकास सोसायटीचा मार्ग निवडलेला आहे.

त्या सोसायटीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्याना पैशाच्या रूपाने मदत करून दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आले त्यामध्ये याचा सर्वाधिक लाभ उजनी कालवा लाभ क्षेत्र व नदीकाठच्या शेतकऱ्यांनी घेतला आहे परंतु गेल्या काही वर्षात वर्षांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत अडचणीत आल्यामुळे सोसायटीतून कर्ज वाटप थांबले असली तरी अजूनही शेतकऱ्यांचा ओढा अजूनही सोसायटीकडेच आहे तालुक्यामध्ये सध्या अकोला, पाटकळ, मल्लेवाडी,धर्मगाव,हाजापुर -जुनोनी, सिद्धापूर,मंगळवेढा, नागणेवाडी, आसबेवाडी,घरनिकी, ढवळस, जंगलगी, मारोळी, जालिहाळ,पौट, मल्लेवाडी ,रहाटेवाडी, लक्ष्मी दहिवडी,शेलेवाडी,खतवडवाडी(पडोळकरवाडी),बाबुराव आवताडे (खुपसंगी), शिरनांदगी, खडकी, सलगर बु, सलगर खु,लवंगी,बठाण, आसबेवस्ती, फटेवाडी, भालेवाडी, जित्ती, मुंढेवाडी तामदर्डी, सिद्धनाथ (बठाण),या 36 सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यामध्ये या सर्व निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत त्यामध्ये बबनराव आवताडे यांच्या गटाला सर्व सोसायटी यांनी एकहाती वर्चस्व प्राप्त करून दिलेले आहेत सोसायटीचे राजकारण हे पक्षाशी निगडीत नसून बबनराव आवताडे यांच्याशी निगडित राहिले आहे त्यामुळे सोसायटी राजकारणात आवताडे सांगेल तोच पक्ष ही परिस्थिती आतापर्यंत चालत आलेले आहे सध्याच्या सद्यस्थितीला त्यांची राजकीय हालचाल पाहता ते महाविकास आघाडी सरकारची संबंधित असलेल्या नेत्यांशी सलगी आहे त्यामुळे भविष्यामध्ये विकास संस्थेच्या माध्यमातून त्यांना ते मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत शेतकऱ्यांना कर्ज रूपाने करू शकतील अशी परिस्थिती आहे. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आर्थिक परिस्थिती सावरल्यामुळे तालुक्याच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना विकास सोसायटीच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा पर्याय अवताडेमुळे उपलब्ध होणार आहे.

सोसायटीच्या राजकारणात असलेले बबनराव आवताडे यांचे राजकीय वर्चस्व मोडीत काढण्यासाठी राज्य स्तरावरील वेगवेगळ्या पक्षातील अनेक मंत्र्यांनी प्रयत्न केला परंतु तालुक्याच्या सहकाराच्या राजकारणामध्ये ग्रामीण भागातील सोसायटीचा सभासद हा बबनराव आवताडे यांच्या पाठीशी राहिल्यामुळे सोसायटीच्या राजकारणात त्यांचे वर्चस्व अबाधित राहिले. पक्षीय राजकारणाचा शिरकाव होऊ शकला नाही सध्या उर्वरित काही सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरूच आहे व काही सोसायटीकडून मतदार याद्या सादर न केल्यामुळे त्यांचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडत असल्यामुळे त्यासंदर्भातील प्रशासकीय कारवाई सहाय्यक निबंधक स्तरावर सुरू आहे.