जिल्ह्यातील 'या' पाच तालुक्‍यांमध्ये कडक लॉकडाउन? शुक्रवारी निर्णय

जिल्ह्यातील 'या' पाच तालुक्‍यांमध्ये कडक लॉकडाउन? शुक्रवारी निर्णय
Lockdown
LockdownEsakal
Summary

ग्रामीणमधील माढा, करमाळा, सांगोला, पंढरपूर व माळशिरस या तालुक्‍यांमधील काही ठरावीक गावांमध्येच रुग्ण वाढत आहेत.

सोलापूर : ग्रामीणमधील माढा (Madha), करमाळा (Karmala), सांगोला (Sangola), पंढरपूर (Pandharpur) व माळशिरस (Malshiras) या तालुक्‍यांमधील काही ठरावीक गावांमध्येच कोरोनाचे (Covid-19) रुग्ण वाढत आहेत. दहापेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या गावांची यादी तयार करण्यात आली असून पाच तालुक्‍यांमधील 50 गावांमध्ये कडक लॉकडाउन (Lockdown) केला जाणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून (Zilla Parishad, Solapur) जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जाणार असून, शुक्रवारी (ता. 6) त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.

Lockdown
जिरायत दोन एकर, बागायत 20 गुंठे खरेदीवर निर्बंध! अशी करता येईल खरेदी

कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात येत असतानाच ग्रामीणमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. शहरातील कोरोना आटोक्‍यात आला, परंतु ग्रामीणची चिंता कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याचे नाव देशभर पसरले असून राज्याने निर्बंध कायम ठेवलेल्या जिल्ह्यांमध्येही सोलापूरचा समावेश आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पाच तालुक्‍यांमधील 50 गावांमध्ये कडक निर्बंध लागू करून तेथील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांच्या माध्यमातून कारवाईदेखील होणार आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत गावातील कोणालाही परगावी जाता येणार नाही, असा तो प्रस्ताव असणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विविध मोहिमांच्या माध्यमातून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु काही बेशिस्तांमुळे ठरावीक गावांमधील कोरोना कमी झाला नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तसा प्रस्ताव तयार केला आहे. आता त्याला शासनाची परवानगी मिळाल्यानंतर त्याची लगेचच अंमलबजावणी केली जाणार आहे.

Lockdown
सांगलीचा नवरा अन्‌ कोल्हापूरची नवरी; धाक मात्र सोलापूरच्या जातपंचायतीचा!

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची बैठक

आषाढी वारीत आरोग्य दूत ही संकल्पना राबविताना दुचाकीची रुग्णवाहिका तयार केली जाते. त्याच धर्तीवर नॉनकोविड रुग्णांसाठी आरोग्य दूत हा उपक्रम सुरू करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. रुग्णवाहिकेची सेवा देताना रिस्पॉन्स टाईम कमी व्हावा, यादृष्टीने प्रयत्न करा, असे त्यांनी बजावले. तसेच तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन झेडपीच्या शाळांसह खासगी शाळांमधील 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करावी, असेही ते म्हणाले. या बैठकीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे, जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com