

Leadership Battle in NCP Solapur Heats Up; Key Decisions Likely in May
sakal
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपनंतर सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीकडून विजयी झालेल्या ११ सदस्यांमध्ये चार सदस्य माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मदतीने विजयी झाले आहेत तर चार सदस्य माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मदतीने विजयी झाले आहेत. उर्वरित तीन सदस्य स्वतंत्रपणे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या ११ सदस्यांपैकी आमदार पाटील यांच्याकडे किती सदस्य आहेत? माजी आमदार शिंदे यांच्याकडे किती सदस्य आहेत? याचा फैसला येत्या काळात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत सध्या कोणाची चलती आहे? आमदार अभिजित पाटलांची की माजी आमदार संजयमामा शिंदेंची, याचे उत्तर येत्या काळात मिळण्याची शक्यता आहे.