Solapur News : गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणारे प्रदीपसिंह राजपूत CBIचे विशेष सरकारी वकील

देशातील विविध महत्त्वाच्या खटल्यात अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार
pradip singh rajput appointment of cbi special govt advocate solapur
pradip singh rajput appointment of cbi special govt advocate solapursakal
Updated on

Solapur News : येथील प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. या निवडीने त्यांची कार्यकक्षा वाढली आहे. आता ते देशातील विविध महत्त्वाच्या खटल्यात अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

९० जणांना जन्मठेप आणि दोघांना फासापर्यंत पोचवून राज्यात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणारे जिल्हा प्रमुख सरकारी वकील राजपूत यांची सीबीआयचे सोलापूर जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांना केंद्र सरकारच्या कायदा मंत्रालयाचे नियुक्तीपत्र मिळाले.

सोलापूर जिल्हा न्यायालयात त्यांनी केलेली विशेष आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. १९९६ पासून त्यांनी वकिली सेवेस सुरवात केली. अडीच वर्षे सहायक सरकारी वकील तर गेल्या साडेपाच वर्षांपासून ते प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. या कारर्किदीत अनेक मोठे खटले अवघ्या काही दिवसात चालवून कमी वेळेत अनेकांना शिक्षेपर्यंत पोचविले आहेत.

त्यांनी केलेला विक्रम उल्लेखनीय आहे. प्रमुख जिल्हा सरकारी वकीलपदी सर्वाधिक काळ राहिलेले राजपूत हे पहिले आहेत. यापूर्वी ते १६ वर्षे दयानंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तर सात वर्षे पोलिस दलात विधी अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच जनता सहकारी बँकेचे ते संचालकही आहेत. त्यांना सोलापूर महानगर पालिकेने मानपत्र देऊन सन्मानित केले आहे.

अनेक वर्षांपासून वकिली करताना अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. तब्बल ९० जणांना जन्मठेप तर दोन जणांना फाशीची शिक्षा देण्यापर्यंत खटला चालवला आहे. त्याचीच दखल घेऊन सीबीआयच्या विशेष सरकारी वकील पदावर माझी नियुक्ती झाली आहे. त्याचा आनंद आहे. या संधीचे सोने करू. मोठे खटले चालवण्याची संधी मिळेल. त्यासाठी चांगले काम करणार आहे.

- प्रदीपसिंह राजपूत, सीबीआय नियुक्त विशेष सरकारी वकील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com