Pralhad Shinde: महान गायक स्व. प्रल्हाद शिंदे मंगळवेढेकरांसाठी उपेक्षितच, स्मारक बनत नसल्याने स्थानिक नाराज
Maharashtra: गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवेढे भूमी संताची या गीतातून मंगळवेढ्यातील संत महिमा व तालुक्याचा कर्तुत्वान इतिहास महाराष्ट्रासह देशासमोर लोकगीतातून सादर करणारे मांडणाऱ्या गायक गायक स्व. प्रल्हाद शिंदे हे मंगळवेढेकरांसाठी मात्र उपेक्षितच राहिले.
संताची भूमी म्हणून महाराष्ट्रभर परिचित असलेल्या मंगळवेढ्यात संता बरोबर महानगायक स्वर्गीय प्रल्हाद शिंदे यांचे नाव आवर्जून घेतले जाते स्वह गायक प्रल्हाद शिंदे यांचे मंगळवेढ्यात वास्तव्य होते आणि लोकगीताच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर परिचित झाले व त्यांच्या गीताची वाढती लोकप्रियता पाहून राज्यासह परदेशात सुद्धा त्यांच्या नावाची व्हाववा मिळाली अजूनही त्यांच्या गीतावर सर्वसामान्य रसिकांचे पाय थिरकतात. विशेषता त्यांनी गायलेली भक्ती गीते सकाळच्या सत्रात अनेकांच्या घरात ऐकली जातात.
याशिवाय आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलावरील गीताला चांगली पसंती भाविकातून मिळाली याशिवाय भीम गीताला देखील चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे गायनातून त्यांनी आपले नाव जागतिक पातळीवर नेले.चल गं सखे चल सखे पंढरीला हे गीत देखील अधिक लोकप्रिय ठरले त्यांचबरोबर त्यांनी गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवेढे भूमी संतांची या गाण्यातून संत दामाजी, चोखामेळा, कान्होपात्रा, गोफनबाई, शामा नायकिन, अन्य संतांचा इतिहास गाण्यातून सादर केला. त्यामुळे मंगळवेढ्यातील संत महात्म्याची माहिती अनेकांना झाले याशिवाय त्यांची अभंग, भक्ती गीते, भीम गीते लोकांच्या पसंतीला उतरली.
मात्र मंगळवेढा नगरपालिकेने पाश्चात त्यांच्या पश्चात फक्त एक स्वागत कमान उभा करून त्यांचे नाव चालवले मात्र या महान गायकाचे मंगळवेढ्यात स्मारक न केल्यामुळे भीमसैनिकातून नाराजी व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसदाराने शिंदेशाही कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील नाव कमावले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्व. प्रल्हाद शिंदे यांचा वारसा पुढे चालू ठेवल्याबद्दल गायक आनंद शिंदे यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा प्रयत्न केला मात्र काही अडचणीमुळे पुन्हा विधानपरिषदेवरील देखील संधी मिळू शकली नाही त्यामुळे राजकीय व शासकीय पातळीवर स्व. गायक प्रल्हाद शिंदे हे उपेक्षित राहिल्याबद्दल मंगळेकरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
आठवडा बाजारमधील स्वागत कमानीला महान गायक स्व. प्रल्हाद शिंदे यांचा नाव देण्यासाठी आम्हीच पुढाकार घेतला भविष्यात त्यांचे मंगळवेढ्यात स्मारक व्हावे.यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून मागणी करणार आहे.
प्रविण खवतोडे, माजी नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

