
-राजकुमार शहा
मोहोळ : "भाजप महायुती सरकारचा स्मार्ट मीटर कायदा, अदानींचा फायदा"अशी घोषणा करीत जनतेच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्यांच्या विरोधात आता जनतेने रस्त्यावर उतरलेच पाहिजे, असे प्रतिपादन खा प्रणिती शिंदे यांनी केले. खा शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी व नजीक पिंपरी या गावांचा दौरा केला त्यावेळी त्या बोलत होत्या.