
सोलापूर : व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो. अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्ष मजबूत आहे. नेते गेल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवून नव्या सक्षम नेतृत्वाच्या उभारणीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.