
सोलापुरात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक झाली आहे.
ED जिसकी मम्मी है, यह सरकार.., प्रणिती शिंदेच्या घोषणेनं खळबळ
सध्या राज्यात विविध पक्षातील राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावरून वातावरण चांगलचं तापलं आहे. काही वादग्रस्त वक्तव्य आणि एकमेकांवर होणार आरोप यामुळे राजकीय वातावरण ढवळलं आहे. दरम्यान, आता सोलापूरमधील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात रस्त्यावर उतरुन जोरदार आंदोलन केलं आहे.
या आंदोलनाच्या निमित्ताने आमदार शिंदे यांनी 'ईडी जिसकी मम्मी है, ओ सरकार निक्कम्मी है', अशी नवी घोषणा दिली आहे. राज्यात ईडीच्या माध्यमातून ज्या कारवाया होत आहेत त्याकडे लक्ष वेधत आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात रस्त्यावर उतरुन ईडीच्या कारवाई विरोधात निषेध केला आहे. या आंदोलनात नव्या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हेही वाचा: कोल्हापूर - अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
सोलापुरात पार पडलेल्या आंदोलनास्थळी आमदार प्रणिती यांनी, डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान असताना गॅस सिलेंडर केवळ चारशे रुपये होता. त्यावेळी भाजपने त्यांना बांगड्या पाठवल्या होत्या. आता आम्ही यांना काय पाठवायचे? असा प्रश्न उपस्थित करत ईडीच्या कारवाई विरोधात आणि भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, सोलापुरात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक झाली आहे. वॉर्ड स्तरावर आंदोलनं केली जात असून आंदोलनं करताना नव्या घोषणा, लोकांच्या मनातील असंतोष मांडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. त्यावेळी महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसचे यूपीए सरकार आणि भाजपचे मोदी सरकार यांच्या भावाढीचा लेखाजोखा मांडला जात आहे.
हेही वाचा: ED कारवाईनंतर राऊतांचं जंगी स्वागत; शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन
Web Title: Praniti Shinde New Slogan Against Central Govt From Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..